मोटार सायकल चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केले अटक.

CRIME चंद्रपूर जिल्हा
Unique Multiservice
Share

सोनू वाळके गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हानां प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन सर यांनी नाउघ गुन्ह्यांचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते,दि 30 एप्रिल 2025 ला स्थानिक गुन्हा शाखा चंद्रपूर येथील उप विभाग पथकातील अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा  यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात मोटार सायकल चोरी मध्ये वाढ झाली असून खूप जास्त प्रमाणात मोटार सायकल चे चोरी होत होती,त्यासाठी मोटार सायकल चा व आरोपीचा शोध घेण्यासाठी  पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर कडून माहिती मिडाली की,एक इसम त्याचे जवडील विना कागदपत्रा शिवाय बिना नंबर प्लेट ची गाडी विक्री करीता बंगाली कॅम्प चौक चंद्रपूर येथे ग्राहकाच्या शोधात फिरत आहे,सादर खबर वरून सापळा रचून स्थागुशा अधिकाऱ्यांनी आरोपी मिलींद जयभरात डंभारे वय 32 वर्ष रा लोणी,ता कोरपना जि चंद्रपूर यास ताब्यात घेऊन खुशाल तेने तपास करून त्याचे कडून वेग वेगळ्या ठिकाणाहून एकूण 9 मोटार सायकल व एक मोपेड गाडी जप्त करून पोलीस स्टेशन रामनगर चंद्रपूर शहर राजुरा तसेच हिंगणघाट जि वर्धा येथील एकूण 6 गुन्हे उघडीस आणले,नमूद आरोपीवर अगोदर चंद्रपूर जिल्ह्यात मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहे,एकूण 4,90,000/ रुपये मुद्देमाल केले आहे,सदर कार्यवाही मा पोलीस अधिक्षक श्री सुदर्शन सर,अप्पर पोलीस अधीक्षक जनबंधु मॅडम,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पो उपनि मधुकर सामलवार, पो उपनि सुनील गौरकार,पोहवा/सुभाष गोहोकर,पोहवा/सतीश अवथरे,पोहवा/रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा/दीपक डोंगरे,पोअ/प्रशांत नागोसे,पोअ/किशोर बकाटे, पोअ/शशांक बदामवार, पोअ/अमोल साबे, पोअ/प्रमोद कोटनाके,व सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत