दि ३० एप्रिल, मंगळवारी रोजी संध्याकाळी पाण्याच्या टाकीच्या सेन्सरची तपासणी करताना एका ६५ वर्षीय व्यक्तीचा त्याच्या अपार्टमेंटच्या टेरेसवरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना नागपुरातील प्रताप नगर येथे घडली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश रामचंद्र देशमुख (६ ५ ) Satish Ramchandra Deshmukh असे मृत व्यक्तीचे नाव असून ते विकता अपार्टमेंट, एफ-१, सुजाता लेआउट, दिनदयाळ नगर येथे राहत होते . सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चौथ्या मजल्यावरील टेरेसवर लोखंडी शिडी चढत असताना त्यांचा तोल गेला व ते खाली पडले त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.
देशमुख यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (वैद्यकीय) नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रवीण रामचंद्र देशमुख (५८) मृताचे भाऊ , यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.