मा.आम.विजुभाऊ वडेट्टीवार यांची आवळगाव येथे वाघाच्या हल्यात मृत्यमुखी पडलेले श्री मनोहर सखाराम चौधरी याच्या घरी सांत्वन भेट.

BREAKING NEWS चंद्रपूर जिल्हा
Unique Multiservice
Share

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

आवळगाव ता ब्रम्हपुरी जि चंद्रपूर येथे वाघाच्या हल्यात मृत्युमुखी पडलेले श्री मनोहर सखाराम चौधरी यांच्या घरी जाऊन मा.आम.विजुभाऊ वडेट्टीवार यांनी सांत्वन भेट दिली. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमध्ये त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.शासनाच्या विविध योजनेतून अधिकाअधिक सहाय्य मिडवुन देण्यासाठी पूर्ण सहकार्य दिले जाईल आणि कुटुंबासाठी खंबीर आधार उभा केला जाईल असे बोलताना मा आम विजुभाऊ वडेट्टीवार म्हणाले. वाघाच्या वाढत्या संख्येमुळे मानव वन्यजीव संघर्ष शिघेला पोहचत आहे,शेतकरी ,मजूर,आदिवासी बांधवाचे जीव जात आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे नुकत्याच पार पडलेल्या अर्भसंकल्पाच्या अधिवेशनात मा.आम.विजुभाऊ वडेट्टीवार यांनी या विषयावर लक्ष्यवेधी सूचना मांडून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती गंभीरता सभागृहात मांडली होती मात्र दुर्दैवाने सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही अशे मा.आम.विजुभाऊ वडेट्टीवार यांनी म्हणाले. अजून किती गरीब शेतकऱ्यांचे जीव जाणार सरकार कधी जागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत