तब्बल दोन वर्षांपासून वन उप तपासणी नाका अंधारात

गडचिरोली जिल्हा
Unique Multiservice
Share

 

3500 रुपयाचे बिल न भरल्यामुळे मीटर सुद्धा जप्त

Health Insurance

कोरची प्रतीनिधी श्याम यादव

कोरची :- मागील काही दिवसांपासून भोंगळ कारभारासाठी चर्चेत राहणाऱ्या वनविभागाचे नवीन प्रताप बघायला मिळत असून कोरची मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मसेली येथील वनउपज तपासणी नाक्याचे अंदाजे 3500 रुपयाचे वीज बिल मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे मागील दोन वर्षांपासून सदर वनउपज तपासणी नाका अंधारात असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे.
मागील दोन वर्षांपासून थकीत विज बिल न भरल्यामुळे यावर्षी मार्च महिन्यात वीज मीटर सुद्धा जप्त करण्यात आले असून अंधाराचा फायदा घेऊन कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून वन विभागाने तपासणी नाका सुरू केले परंतु सदर नाकाच अंधारात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी कोरची तालुक्यात वन्य प्राण्यांची कातडी तस्करी प्रकरण घडले होते तर कोट्यवधी रुपयाचे सागवण तस्करीचे प्रकरण सुद्धा नागरिकांमुळे उघडकीस आले होते. जर अशा घटना वेळोवेळी तालुक्यात घडत असतील तर नाक्यामध्ये रात्री अंधारात सेवा बजवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मसेली येथे असलेला वन उपज तपासणी नाका हा गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याला जोडला असल्यामुळे येथे नेहमीच हलक्या तसेच जड वाहनांची वर्दळ असते. कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये व वन संसाधनाचे जतन व्हावे म्हणून या ठिकाणी सदर नाका असून त्याचे खरच उपयोग होत आहे का? असं सुद्धा खूप मोठा प्रश्न चिन्ह उत्पन्न होत आहे.

 
वनउपज तपासणी नाक्याचे वीज बिल मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता व मार्च 2025 ला मीटर सुद्धा काढण्यात आले आहे

एन. जी. कोरचा
कनिष्ठ अभियंता, म. रा. वि. वी. कोरची

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत