चामोर्शी येथील नवजीवन नर्सिंग स्कूलमध्ये परिचारिका शपथविधी कार्यक्रम उत्साहात पार पडला.

गडचिरोली जिल्हा
Unique Multiservice
Share

चामोर्शी येथील नवजीवन नर्सिंग स्कूलमध्ये परिचारिका शपथविधी कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमात परिचारिकांनी (सिस्टर) मेणबत्ती पेटवून शपथ घेतली. या प्रसंगी बोलताना मा.खा. अशोकजी नेते यांनी परिचारिका व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. परिचारिका प्रशिक्षणातून सुसज्ज झालेल्या परिचारिकांद्वारे समाजाला आरोग्याची महत्त्वपूर्ण सेवा दिली जाते. कोरोनाच्या कठीण काळात आरोग्य सेवकांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेत मोलाचे योगदान दिले. त्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी रेमडेसिव्हर इंजेक्शनपासून ते इतर आवश्यक साधनांची उपलब्धता योग्य रीतीने सुनिश्चित केली. मी अशा सेवेला सलाम करतो.”

प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन:
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम आणि सहकार आघाडीचे जिल्हा प्रकोष्ठ अध्यक्ष व नगरसेवक आशिषभाऊ पिपरे यांनीही प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते,जेष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे, नवजीवन नर्सिग काॅलेज चे प्राचार्य गोरडवार सर,चामोर्शी ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. क्रिष्णाजी वाघमारे, संस्थापिका लता गोवर्धन मॅडम, डॉ.मृणाल गोवर्धन, डॉ. वैभवी गोवर्धन,तसेच नवजीवन नर्सिग काॅलेज चे कर्मचारी व सिस्टर स्टाफ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवजीवन नर्सिंग स्कूलचे सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम घेतले. उपस्थित सर्व मान्यवरांनी परिचारिकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आरोग्य सेवेसाठी समर्पित परिचारिका तयार करणाऱ्या नवजीवन नर्सिंग स्कूलच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत