राज्य राखीव पोलीस दला तर्फे दीक्षाभूमी येथे बुद्ध जयंती साजरी.

नागपुर महत्वाची बातमी
Unique Multiservice
Share

जावेद अली उपसंपाद

Health Insurance

राज्य राखीव पोलीस दला तर्फे दिक्षाभूमी येथे तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी

12 मे 2025 रोजी दिक्षाभूमी नागपूर येथे सर्व धर्म सन्मान सेवाभावी समाज विकास बहुउद्देशीय संस्था नागपूर तसेच डी कंपनी राज्य राखीव पोलीस बल गट क्र.4 नागपूर तर्फे तथागत गौतम बुद्ध यांची 2569 वी वैशाख बुद्ध पौर्णिमा जयंती उत्साहात पार पडली. सदर कार्यक्रमास सौ.वृंदाताई विकास ठाकरे व राज्य राखीव पोलीस बल गट क्र.4 नागपूर चे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद तायडे, संस्थेचे संयोजिका सौ.मंदाताई वैरागडे, सौ.मायाताई थोरात, सौ.सावी वासनिक तसेच संस्थेचे इतर सभासद व राज्य राखीव पोलीस बलातील सहा.फौजदार नेवारे,पोलीस हवा. दैवलकर, पोलीस हवा.नेहारे, पोलीस हवा. लेनगुडे, पोलीस हवा.नांदुरकर, पोलीस हवा. नारनवरे, सपोना कामडे,बोडखे, राठोड, देवकर, पंधरे, रामटेके, जानोरकर, ब्राह्मणे, गुप्ता पोलीस शिपाई वासनिक, मोमीन, सावंत, सोनारे, खारडे, मानकर, बघेले, चौधरी, अटराहे तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. सर्व धर्म सन्मान सेवाभावी समाज विकास बहुउद्देशीय संस्था व राज्य राखीव पोलीस बल गट क्र.4 नागपूर तर्फे राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत