सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली,न्युज जागर

14 एप्रिल 2025 ला लुम्बिनी नगर चामोर्शी येथे प्रेरणा बौद्ध मंडळ व सावित्री रमाई महिला मंडळ च्या संयुक्त विद्यमाने सकाळी 9 वाजता ध्वजारोहण चा कार्यक्रम आयोजित केला असून ध्वजारोहक म्हणून मा रत्नदीप साखरे हे प्रमुख पाहुणे होते तसेच व्यासपीठावर प्रेरणा बौद्ध मंडळाचे अध्यक्ष मा के.डी. मेश्राम साहेब,मार्गदर्शन म्हणून लाभलेले मा अशोक मांदाडे सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष मा आर डी राऊत साहेब व मा अरुणा रामटेके मॅडम उपस्थित होते. संचालक म्हणून विजय मेश्राम यांनी केले.संध्याकाळी 6 वाजता भीमरॅली चे आयोजन करून रॅली ही नियोजित विहारातून निघाली असून असंख्य बौद्ध बांधव पांढरे शुभ्र कपडे वस्त्र घालून भीमरॅली सहभागीं झाले त्यानंतर रॅली ही bastop वरच्या समाजाच्या नियोजित जागेवर जाऊन बुद्ध वंदना व महापुरुषांना पुष्प वाहून भीम रॅली ही पुन्हा आपल्या लुम्बिनी विहार येथे आली. लगेच बुद्ध वंदना होताच भोजनाला सुरवात झाली.या आयोजित प्रोग्राम मध्ये प्रेरणा बौध्द मंडळ च्या आयोजक व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली.