सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

7 एप्रिल रोजी कोरची येथील हॉटेल स्टे इन येथे सोमवार ला व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची घोषणा एका दिमाखदार बैठकीत करण्यात आली.या निवड प्रक्रियेला जिल्हा सचिव श्री विलास ढोरे यांनी आपल्या अध्यक्षतेखाली दिशा दिली ,तर जिल्हा कार्यध्यक्ष मा नाशिर हाशमी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले.या बैठकीत श्री मधुकर नखाते यांची तालुका अध्यक्ष पदी आणि सुरज हेमके यांची सचिवपदी निवड झाली या नव्या नेतृत्वाच्या निवडीमुळे स्थानिक पातळीवर माध्यम क्षेत्रात नवचैतन्य येण्याची शक्यता निर्माण झाली आहे व्हॉईस ऑफ मीडिया चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप काळे ,प्रदेशाध्यक्ष श्री अनिल मस्के ,प्रदेश कार्याध्यक्ष श्री मंगेश खाटीक,विदर्भ अध्यक्ष श्री किशोर कारंजेकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील 12 ही तालुक्याची नव्याने कार्यकारिणी बनविण्याचे काम सुरू आहे.या कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली उपाध्यक्ष पदी श्री राष्ट्रपाल नखाते,कोषाध्यक्ष लालचंद जनबंधु तालुका तालुका कार्यध्यक्ष पदी श्री प्रशांत कराडे याची निवड झाली.याशिवाय जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून राहुल अंबादे आणि आशिष अग्रवाल यांचे नाव पुढे आले.कार्यकारिणीच्या सदस्य पदी नंदकिशोर वैरागडे ,श्यामकुमार यादव,शालीकराम कराडे आणि अरुण नायक यांना स्थान देण्यात आले.सर्व पदाधिकार्यांची निवड ही सर्वसंमतीने झाली असून या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सहमती याचा समतोल राखला गेला हा कार्यक्रम नसून संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसाठी एक पहिला पाऊल म्हणून पाहल्या जात आहे.सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनि अस म्हटले की स्थानिक समस्यांना वाचा फोडण्याचे आणि समाजहितासाठी कार्य करण्याचे अश्वासन दिले.राज्य प्रदेश कार्यध्यक्ष मंगेश खाटीक यांनी दूरध्वनी द्वारें सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व टीम ला शुभेच्छा देताना व्हॉईस ऑफ मीडिया च्या माध्यमातून तालुका सकारात्मक बदल घडवुन आणण्याचा विश्वास व्यक्त केला.या प्रोत्साहन मुळे नवनिर्वाचित पदाधिकारी मध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.