वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर जिल्हा
Unique Multiservice
Share

सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, न्युज जागर,गडचिरोली

शेतातील उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मुल तालुक्यातील चितेगाव शेतशिवारात शनिवारी सकाळी 9 वाजता दरम्यान घडली.शेषराव पांडुरंग नागोसे(sheshrao pandurang nagose) वय 36 वर्ष रा चितेगाव असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.सदर घटना ही सावली मध्ये उमा नदीच्या काठाजवल घडली परंतु वाघाने त्याला पकडून मुल वनपरिक्षेत्र मध्ये आणले.सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनास्थळाला चीचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे,मुल चे प्रभारी क्षेत्र सहा नालमवार,केळझर चे पडवे,मुल चे वनरक्षक ठाकूर यांनी पंचनामा करून शव मुल उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.शेषराव च्या पत्नीला वनविभागातर्फे तात्काळ 50000rs मदत देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत