जावेद अली,उपसंपादक, अहेरी
वार्तापत्र
सन 2023-2024 व 2024-2025 या दोन्ही वित्तीय वर्षात एकूण 3,96,65,965/ रुपयांचा अपहार झाला होता,शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला आधारभूत किंमत देण्याकरिता शासन विविध योजना राबवित असते,राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांनी पिकवलेले धान विविध खरेदी केंद्रावर खरेदी केली जाते,खरेदी केलेल्या धानाची प्रादेशिक कार्यालय समिती स्तरावर मा जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने नेमलेल्या मिलर्सकडून बँक गॅरंटीच्या प्रमाणात धानाचे वितरण केले जाते जावक धानाचे वितरण आदेश मिलर्स व खरेदी केंद्रावरील केंद्रप्रमुख यांच्या स्वाक्षरीने वजन पावत्यासह उप प्रादेशिक कार्यालयास सादर केले जातात,मिलर्सने उचल केलेल्या धानाची भरडई करून तयार केलेले तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे अधिनस्त गोदामात जमा करण्यात येतो,जमा केलेल्या तांदळाचा स्वीकृत पावत्या मिलर्सद्वारा प्रादेशिक कार्यालयास सादर करण्यात येतात,परंतु सदर प्रक्रियेदरम्यान देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात धानाचे अपहार झाल्याचे दिसून आले गडचिरोली जिल्ह्यातील उप प्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम 2023-2024 व 2024-2025 या दरम्यान अपहार झाल्याचे आढळले ,प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोली तर्फे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते,सदर चौकशीत अशे आढळून आले की अदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्या ,देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम 2023-2024 मध्ये एकूण 19860.40 क्विंटल धानाची खरेदी झाली होती त्यापैकी प्रत्यक्ष 15916.32 क्विंटल धन भरडई जावक झालेला असून उर्वरित 3944.08 क्विंटल धानाची तफावत दिसून आली,तसेच एकदा वापरलेले बारदाने यांच्या संख्येत देखील तफावत दिसून आल्याने एकूण 1,53,93,980/ रुपये इतक्या रकमेचा अपहार झाल्याचे आढळुन आले,2024-2025 मध्ये धानाची खरेदी तापसनी दरम्यान एकूण 17262.40 क्विंटल धानाची खरेदीबझाली असून त्यापैकी प्रत्यक्ष 11122.40 क्विंटल धन केंद्रावर आढळून आले उर्वरीत 6140.00 क्विंटल धानाची तफावत दिसून आली,एकदा वापरलेले बारदान यांच्या संख्येत सुद्धा तफावत आढळली. एकूण रुपये 2,42,72,885/ रुपये इतक्या रकमेचा अपहार झालेला आढळून आला,अश्या प्रकारे दोन्ही वित्तीय वर्षात एकूण 3,96,65,965/ रुपये रकमेचा अपहार झाल्याचं चौकशी दरम्यान निष्पन्न झाले.या करिता उप प्रादेशिक व्यवस्थापक कुरखेडा मुरलीधर शंकर बावणे,प्रभारी विपणन निरीक्षण तथा ग्रेडर चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर,विपणन निरीक्षक तथा ग्रेडर हितेश व्ही पेंदाम, सचिवं महेंद्र इस्तारिजी मेश्राम, व इतर 103 अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक मंडळ,आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या देऊळगाव यांनी पदाचे कर्त्यव्य जबाबदारी यात कसूर केल्या कारणाने,उप प्रादेशिक व्यवस्थापक म.रा.स.ह. अदिवासी विकास महामंडळ मर्या आरमोरी श्री हिम्मतराव सुभाष सोनवणे याच्या लेखी फिर्यादीवरून पोलीस स्टेशन कुरखेडा येथे दि 19/4/2025 ला अप क्र 69/2025-कलम 316(5),318(4),3(5) भान्यास अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला,गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी नामे चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर वय 39 वर्ष,व्यवसाय (नौकरी) प्रभारी विपणन तथा ग्रेडर,आदिवासी विविध कार्य संस्था मर्या देऊळगाव रा लहान गोधणी पो जुना उमरसरा तह जी यवतमाळ, हितेश व्ही पेंदाम वय 35 वर्ष (नौकरी) विपणन निरीक्षक तथा ग्रेडर रा आरमोरी जी गडचिरोली,यांना अटक केले असून त्यांना मा न्याय दंडाधिकारी कुरखेडा यांचे समक्ष हजर करण्यात आले सदर कार्यवाही पो अधीक्षक निलोत्पल, अप्पर अधीक्षक यतीश देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ पो स्टे कुरखेडा व अंमलदार यांनी पार पाडली.