सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
दि 19 एप्रिल 2025 कुरखेडा तालुक्यातील गुरणोली येथे सिने अभिनेता नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात नाम फाऊंडेशन टाटा मोटर्स ,महाराष्ट्र्र शासन च्या माध्यमातून गवे पाणीदार करण्याचे हेतूने मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे,नाम फौंडेशन चे CEO श्री गणेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणांची कामे गावागावात करण्याचा मानस चालू आहे,त्याच धर्तीवर नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या सहकार्याने आजपासून येथील तलावाचे खोलीकरनाचा ,गाळ उपसा,कामाचे भव्य शुभारंभ करून सुरुवात करण्यात आली आहे,या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्याचे पद्मश्री डॉ परशुराम खुने यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला,प्रमुख पाहुणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना चे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय खुणे,सरपंच सुप्रिया तुलावी, उपसरपंच मंगेश कराडे, ग्रामसेविका आरती भोयर, गावातील प्रतिष्ठित देवानंद जी खुणे,लक्ष्यापती गुटके,श्रीकांत गोवडे, पुरुषोत्तम गोवाडे,मुनाभाऊ डहारे,पारस खुणे,विवेक बुद्धे,राष्ट्रीय मानवाधिकार जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, रोजगार सेवक सचिन सहारे,व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी डॉ परशुराम खुणे,डॉ प्रणय खुणे व नाम फाऊंडेशन विदर्भ समन्वय उमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले यांनी सांगितले की यामुळे निश्चितच पाण्याचा स्थर वाढणार आहे व लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग द्यावा असेही म्हटले सदर योजनेचे शुभारंभ करत असताना गुरणोली येथील नागरिकांनी नाम फाऊंडेशन टाटा मोटर्स व महाराष्ट्र शासन यांचे जाहीर आभार मानले.