राहुल गर्गम ,तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी हे अतिशय महत्त्वाचे तालुका असून उपजिल्हा रुग्णालय आहे,मात्र या ठिकाणी अतिशय महत्वाचे पद व डॉक्टर नाही या ठिकाणी डेंटिस्ट डॉक्टर ची अतिशय आवश्यक पद नाही. जनता आलापल्ली येथे खाजगी दवाखान्यात जाऊन हजारो रुपये खर्च करून उपचार करावे लागत आहे,अहेरी उपजिल्हा रुग्णालय असल्याने अहेरी येथे एटापल्ली भामरागड ,सिरोंचा, मूलचेरा तालुक्यातील रुग्ण रुग्णालयात येत असतात मात्र डॉक्टर नसल्याने आलापल्ली येथील खाजगी रुग्णालयात जाऊन हजारो रुपये खर्च करतात करिता जिल्हा शल्यचिकित्सक किलनाके मॅडम या विषयाकळे लक्ष देऊन डेंटिस्ट ची पूर्ण वेळ नियुक्ती करावी अन्यथा राष्ट्रीय मानवाधिकार संगठण आंदोलन करणार.