नागपूर : पराशिवनी येथे चोरट्यांनी भानेगाव टी पॉइंट येथील एटीएम मशीन चोरली असून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
भानेगाव येथे नीलेश राऊत यांचे घरासमोरील अंगणात वक्रांगी कंपनीचे एटीएम मशीन असून मंगळवारी रात्री १.३० वा च्या सुमारास एक पांढरी चारचाकी गाडीतून तीन जण उतरले आणि एटीएम मशीनजवळ पोहोचले व एटीएम मशीन रूममध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंग फवारला व एटीएम मशीन उचलली आणि चारचाकी गाडीत भरली.
चोरट्यांनी एटीएम मशीन सह वाहनातून पारशिवनीच्या दिशेने गेले, सदर चोरीची घटना निलेश राऊतच्या घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बुधवारी पहाटे ५ वाजता मॉर्निंग वॉकला जात असताना एटीएम मशीन दिसत नसल्याने निलेशने ११२ वर फोन करून एटीएम मशीन चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना दिली. news jagar
नोव्हेंबरमध्ये निलेश राऊतने वक्रांगी कंपनीकडून एटीएम मशीनची एजन्सी घेतली होती. निलेश राऊत हे एटीएम मशीन ट्रेमध्ये पैसे भरणे, मशीनची देखभाल आणि दुरुस्ती कमिशनवर करत आहेत. मंगळवारी नीलेश राऊतने एटीएम मशीनच्या ट्रेमध्ये १७२००० रुपये ठेवले होते. ग्राहकाने एटीएममधून १२९७०० रुपये काढले आणि ४२३०० रुपये मशीनमध्ये राहिले. एटीएम मशीनची किंमत २,१०,००० रुपये आहे.
चोरट्यांनी एटीएम मशीन आणि त्यातील रोख रक्कम अशी एकूण २,५२,३०० रुपये किमतीची चोरी केली. आरोपींचा शोध नागपूर ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा घेत आहे
