Meditrina Hospital unsafe - building evacuated

मेडिट्रिना हॉस्पिटल असुरक्षित – इमारत रिकामी करण्याचे आदेश

BREAKING NEWS गडचिरोली जिल्हा गोंदिया चंद्रपूर जिल्हा नागपुर महत्वाची बातमी महाराष्ट्र
Unique Multiservice
Share

नागपूर (nagpur): नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) अग्निशमन विभागाने मेडिट्रिना हॉस्पिटलला आवश्यक अग्निसुरक्षा आणि जीवनसुरक्षा उपाययोजना न पूर्ण केल्यामुळे अत्यंत असुरक्षित घोषित करून तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. .
हॉस्पिटलमध्ये अग्निसुरक्षा आणि जीवनसुरक्षा उपाययोजनांचा अभाव, अनियमितता आणि विविध नियमभंग यांकडे लक्ष वेधून हॉस्पिटल तात्काळ बंद करण्याची मागणी पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली होती, NMC च्या आरोग्य विभागाने 12-02-2025 रोजी हॉस्पिटलला इशारा दिला होता की, एक महिन्याच्या आत अंतिम अग्नि संरक्षण मान्यता प्रमाणपत्र (Fire Compliance Certificate) प्राप्त केले नाही, तर नोंदणी रद्द केली जाईल.पण सूचना देऊनही हॉस्पिटल ने पूर्तता न केल्यामुळे सदर कार्यवाही करण्यात आली आहे.
18-02-2025 रोजी NMC अग्निशमन विभागाने हॉस्पिटलला “अत्यंत धोकादायक” घोषित करत सर्वांना त्वरित बाहेर पडण्याचा आदेश दिला.

13 वर्षांपासून हॉस्पिटलकडे अंतिम अग्नि संरक्षण मान्यता प्रमाणपत्र नसणे , अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार, हॉस्पिटलमध्ये 29 प्रकारच्या अग्निसुरक्षा उपाययोजनांचा अभाव असणे , अनधिकृत बांधकामांमुळे आणि ऑक्सिजन प्लांटमुळे अग्निशामक वाहनांना हॉस्पिटलच्या मागील व बाजूच्या भागात प्रवेश नाही, टेरेसवर अनधिकृत स्वयंपाकघर आणि स्टोअर रूम तसेच बेसमेंट पार्किंगचा गैरवापर जनरेटर व इतर उपकरणांसाठी केला जात असल्याचे कारणास्तव प्रशासनाने सदर कार्यवाही केली असल्याचे सांगण्यात येत आहे. news Jagar

मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रा. लि. ची स्थापना डॉ. समीर पालतेवार यांनी 19-02-2012 केली असून, डॉ. समीर पालतेवार यांचेवर दि . 22-01-2019 रोजी आतापर्यंत 26 रुग्णांकडून अनधिकृत शुल्क वसूली , महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत बनावट कागदपत्रे (डेबिट व्हाउचर), IPC कलम 406, 420, 465, 467, 468, 471, 120(B), 34 अंतर्गत गुन्हा दाखल, तर 20-01-2021 रोजी बनावट बिलिंग आणि आर्थिक तफावत, रुग्णांकडून घेतलेली रक्कम आणि हॉस्पिटलच्या खात्यात जमा झालेली रक्कम यामध्ये मोठा फरक, यासाठी IPC कलम 406, 409, 420, 465, 467, 468, 471 आणि IT कायदा कलम 66C , दि 20-02-2021 ला परत IPC कलम 406, 409, 420, 465, 467, 468, 471 आणि IT कायदा कलम 66C अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर 14-12-2024 ला चौथ्यांदा BNS कलम 126(2), 115(2), 352, 3(5) इत्यादी डॉ. समीर पालतेवार यांच्यावर आर्थिक घोटाळे आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत