काटोल तालुक्यातील डोरली जवळील कोतवालबड्डी येथील एसबीएल बारूद कंपनी त भीषण स्फोट

BREAKING NEWS नागपुर महत्वाची बातमी महाराष्ट्र
Unique Multiservice
Share

काटोल तालुक्यातील डोरली जवळील कोतवालबड्डी येथील एसबीएल बारूद कंपनी त भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
दि . 16 फेब्रुवारीला (रविवार) या बारूद कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह पोलिस, अग्निशमन, रुग्णवाहिका, फॉरेन्सिकचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की या स्फोटाचे हादरे परिसरात अनेक किलोमीटर अंतरावर बसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.तसेच या घटनेमुळे नजीकच्या जंगलातसुद्धा या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात आग पसरल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी आजुबाजूच्या गावातून लोकांनी गर्दी केली. या कंपनीत फटाक्यात लागणारी बारूद या ठिकाणी तयार होत असल्याची माहिती आहे. news jagar

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत