Rape & murder at hudkeshwar

हत्या आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात २५ वर्षीय युवकास अटक

BREAKING NEWS CRIME नागपुर महत्वाची बातमी
Unique Multiservice
Share

हत्या आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात २५ वर्षीय युवकास अटक

६ फेब्रुवारी २०२५ रोजी हुडकेश्वर येथील अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परतली तेव्हा तिला तिची आई बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आणि कानातून रक्त वाहत असलेल्या अवस्थेत आढळली. गंभीर अवस्थेत आढळून आल्यानंतर ताबडतोब शेजाऱ्यांना माहिती दिली. पीडितेला तातडीने वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. news jagar
सुरवातीस अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आले होते पण शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचार आणि गळा दाबून खून केल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनीही तपस चक्रे फिरविली , तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी रोहित गणेश टेकाम (२५) रा . कान्हादेवी ता . पारशिवनी येथील युवकास अटक केली चौकशीत टेकामने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत