अमित साखरे उपसंपादक *
चामोर्शी शिवाजी हायस्कल तथा कनिष्ठ महाविद्यालयात नेहरू युवा केंद्र आणि शिवकल्याण मल्टिपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार कार्यक्रमाला नवनिर्वाचित आमदार डॉ मिलिंद नरोटे उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक पाटील यांच्या हस्ते डॉ मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांचा सत्कार करण्यात आला. डॉ मिलिंद नरोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपण स्वतः मधील वेगळेपण जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत तुम्हाला विकासाचा मार्ग सापळणार नाही असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालयातील 3 विध्यार्थी त्यात ओमकार सोनटक्के, कोयल खेडेकर,आणि पवन चौधरी यांचा अझीम प्रेमजी बंगलोर या नामांकित विध्यापीठात प्रवेश मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सोबतच माजी विध्यार्थी विशाल मेश्राम अझीम प्रेमजी विद्यापीठ बंगलोर व पायल लाटेलवार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तुळजापूर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित चामोर्शीं शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अमित पुंडे,प्राचार्य दीपक पाटील, शिवकल्याण संस्थेचे अध्यक्ष अनुप कोहळे, प्रा. रमेश बारसागडे , प्रमोद भगत, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोषी सुत्रपवार यांनी केले.