बल्लारपूर विधानसभेची निवडणूक आता हात गहिवर आली असून राज्याचे वने सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वर काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत समर्थकाकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या सुरक्षारक्षक आडवे झाल्याने पुढील अनर्थ टाळला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मूल तालुक्यातील कोसंबी येथे ही घटना घडल्याची माहिती आहे.sudhir mungantiwar
विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्री तसेच उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे कोसंबी येथे गावातील तलावाचे विषयावर आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करीत असताना, तेथे काँग्रेस उमेदवार संतोष रावत, बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, विजय चिमड्यालवार, बाबा अझीम, अन्वर शेख आले. सुधीर मुनगंटीवार यांनी संतोष रावत यांना, आपण येथे बैठक घेत नसून, कार्यकर्त्यांकडून समस्या समजून घेत आहोत मी इथला आमदार आहे आणि हे माझे काम आहे असे सांगितले. मी इथून गेल्यानंतर तुम्ही ही बैठक घेऊ शकता माझी काही हरकत नाही असे सांगत असतानाच काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुनगंटीवार यांचे सुरक्षारक्षकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
यावेळी महिलांनी काही काँग्रेस कार्यकर्त्यांना चांगला चोप दिल्याची माहिती आहे. यामुळे मुनगंटीवार यांनी जोपर्यंत पोलीस येत नाही तोपर्यंत हलणार नाही अशी भूमिका घेतल्याची माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेस समर्थकांनी मुल पोलीस स्टेशनमध्ये डेरा मांडून सुधीर मुनगंटीवार सह भाजप कार्यकर्त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे News Jagar